जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथील आयटीआय महाविद्यालयासमोरून कारचे कॅटेलिटीक कन्व्हर्टर आणि सायलेन्सरसह 50 हजारांचे साहित्य चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कारमधील साहित्य चोरीने उडाली खळबळ
युवराज चांगू पाटील (39, रा.कुसुंबा, ता.जि.जळगाव) हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरुवार, 23 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता त्यांनी त्यांच्या मालकीची कार (एम.एच.19 सी.व्ही.3976) ही गावातील आयटीआय महाविद्यालयाजवळ पार्किंग केली होती. अज्ञात चोरट्याने कारचे सायलेंन्सर आणि कॅटेलिटीक कन्व्हर्टर मिळून 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही बाब शुक्रवार, 24 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. या प्रकरणी युवराज पाटील यांनी मंगळवार, 28 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार गफ्फार तडवी करीत आहेत.