यवत । सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील यवत गावच्या हद्दीत महती कंपनीजवळ भरधाव मोटारीच्या धडकेत गायीचा मृत्यू झाला. यात चौघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.
हा अपघात रविवारी दुपारी 2.30 च्या सुमारास झाला. श्रीगोंद्यातील आढळगाव येथील रहिवासी सागर नवले, गोरख शिंदे, हिराबाई खेतमाळस, वैशाली जमदाडे, अलका जमदाडे हे मोटारीने वानवडी येथील कमान हॉस्पिटल येथे नातेवाईकाला बघण्यासाठी जात होते. कंपनीजवळ गाय रस्ता ओलांडत होती. भरधाव मोटारीची रस्ता ओलांडणार्या गायीला जोराची धडक बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी चालकाचा मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार तब्बल 200 फूट लांब जाऊन थांबली.