जामनेर । तालुक्यातील गाडेगाव येथे शाळेत जाण्यासाठी रस्ता पार करणार्या विद्यार्थ्यांना भरधाव कारने धडक दिल्याने 6 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याबाबत जामनेर पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील सुनसगाव बुचे सरपंच श्यामकांत रामदास भंगाळे हे जळगावला राहतात. ते जळगावहुन कामानिमीत्त नेरीकडे जात असतांना गाडेगाव येथे शाळेचे विद्यार्थी रस्ता पार करतांना त्यांच्या कार क्रमांक (एमएच 19 सीई 5758) ची धडक शाळेच्या विद्यार्थ्यांना बसली. यात कोमल बर्हाटे,राजू खरे,प्रतिभा मोरे,आशिष मोरे,निकीता बोरोले,पुजा पवार हे 6 विद्यार्थी जखमी झाले.याबाबत जामनेर पोलिस स्टेशनला श्यामकांत भंगाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उप निरीक्षक विकास पाटील करीत आहे. दरम्यान श्यामकांत भंगाळे यांना अपघातानंतर गावातील संतप्त जमावाने जबर मारहाण केल्याचे कळते.