यावल- फैजपूर रस्त्यावर प्रवाशांनी भरलेली अॅपे रीक्षा व कारमध्ये विचित्र अपघात होवून तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजता घडली. भरधाव कारने कट मारल्याने अॅपे रीक्षा चालकाचा ताबा सुटल्याने ती उलटली. या रीक्षात नांदूरखेडा येथे राहणारे काही मजूर कामासाठी शहादा येथे जात असताना यावल-फैजपूर रस्त्यावर सांगवी गावाजवळ अपघात झाला. या अपघातात लक्ष्मण सोनू भील (61), देवराम गुलाब भील (35) आणि विजय दरबार इमणे (35) यांना गंभीर दुखापत झाली. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.वैशाली निकुंभ, डॉ.स्वाती कवडीवाले, सरला परदेशी, आरती कोल्हे, पिंटू बागुल आदींनी उपचार केले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना जळगाव सरकारी रुग्णालयात हलवले.