कारमधून बॅगची चोरी

0

शिक्रापूर :  पुणे-नगर रस्त्यावरून काही इसम कारने नाशिकला चालले होते. चहा पिण्यासाठी प्रवासी थांबले होते. तर चालक कारमध्ये बसला होता. यावेळी अचानक एक युवक तिथे आला आणि कारच्या पुढच्या नंबरप्लेटवर ऑइल टाकून पळून गेला. हे ऑइल पुसण्यासाठी चालक गाडीतून उतरला. कार मालकाला गाडीत बॅग दिसली नाही, म्हणून त्याने चालकाकडे विचारणा केली. त्यावेळी अज्ञात युवकाने बॅग लांबवल्याचे समोर आले. या बॅगमध्ये 32 हजारांचा ऐवज होता. याबाबत कारचालक मनोज प्रभाकर देशपांडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.