कारमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

0

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत 11 वी मध्ये शिकणार्‍या एका विद्यार्थीनीवर चालत्या गाडीत बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ओळखीच्या तीन जणांनी पीडित मुलीवर अत्याचार केला आहे. यामध्ये एक विद्यार्थी, नातेवाईक आणि आणखी एक व्यक्तीचा समावेश आहे. तीन जणांनी चालू कारमध्ये 11 तास सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर पहाटे दीड वाजता तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले. पीडित मुलगी अल्पवयीन आहे. आरोपीवर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाही आरोपीला पडकण्यात पोलिसांना यश आलेल नाही. रस्त्यावर पीडितेला फेकून दिल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. घटनेच्या दिवशी मुलीची स्कूलबस सुटली होती. ती चालत घरी जात होती त्याचा फायदा आरोपीने घेतला.