जळगाव प्रतिनिधी । कारला मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना जिल्हा बँकेच्या समोर रिंगरोडवर घडली.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ येथील जुना सातारा भागातील नगरसेवक मुकेश पाटील हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत कारने (क्रमांक एमएच-१९, बीयू ८) रिंगरोडवरुन जात असताना जेडीसीसी बँकेच्या वळणावर मागून भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने (क्रमांक एमएच-१९, सीएस, ४६५६) कारला मागून धडक दिली. दुचाकीस्वार कारच्या मागील काचेवर जोरात धडकल्याने कारची मागील काच फुटली. ही दोन्ही अपघातग्रस्त वाहने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणली होती. यात तडजोड झाल्याने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.