कारला 407 ची धडक

0

जळगाव। दाणाबाजारात खरेदीसाठी आलेल्या व्यापार्‍याच्या कारला समोरून येणार्‍या 407 ट्रकने जोरदार धडक दिली. ही घटना शनिवारी सकाळी 1.45 वाजेच्या सुमारास विसनजीनगरातील होमगार्ड कार्यालयासमोर घडली.

जामनेर तालुक्यातील पहुरपेठ येथील रहिवासी आनंद सतिष लोढा (वय-25) यांचे जागरा ट्रान्सपोर्ट नावाच दुकान असून शनिवारी ते आई, बहिण व चालक ी यांच्यासह एमएच.19.सीयु.8009 ने पहुर येथून जळगावातील दाणाबाजारात खरेदीसाठी सकाळी 11.30 वाजता आले होते. दुपारी 1.45 वाजता खरेदी झाल्यानंतर आनंद लोढा हे विसनजीनगरातील होमगार्ड कार्यालयाजवळून जात असतांना समोरून येणार्‍या 407 ट्रक (एमएच.04.सीजी.1732) ने कारला जोरदार धडक दिली. यात कारचे नुकसान झाले आहे.