कारवाईची मागणी

0

पिंपरी-चिंचवड । वल्लभनगरातील महापालिकेच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य करणार्‍या शिक्षकावर कडक कारवाई करावी. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

या विषयासंदर्भात राष्ट्रवादी युवती काँग्रेस व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष वैशाली काळभोर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहर संघटक वर्षा जगताप, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, सुलक्षणा शिलवंत, राष्ट्रवादी युवती काँग्रेस उपाध्यक्ष रुपाली घाडवे, मेघना जगताप उपस्थित होत्या.