पिंपरी । तत्कालीन शिक्षण मंडळाने आजपर्यंत शहरात वाढलेल्या अनधिकृत शाळांवर कोणती कारवाई केली, ही माहिती महापालिका प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड परिवर्तन पक्षाने केली आहे. यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील 25 शाळा अनधिकृत असल्याचे शिक्षण मंडळाने जाहीर केले होते. परंतु, महापालिका प्रशासनाकडून या अनधिकृत शाळांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अनधिकृत शाळा बांधणार्या संस्था चालकांना पाठबळ मिळत आहे. शहरात अनधिकृत शाळांची संख्या वाढत चालली आहे. पालकांनीही अशा अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये. अशा अनधिकृत शाळांकडून दंड आकारावा, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.