मुख्याधिकार्यांवर कारवाई हवी ; पोलिसांकडून तक्रारीच्या अनुषंगाने तपासाला वेग
भुसावळ- शेतजमीन एन.ए.करण्यासाठी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांच्यासह सात जणांनी तीन लाखांची खंडणी मागितली मात्र रकमेची पूर्तता न केल्याने आपली फाईलच पालिकेतून लांबवण्यात आल्याने उभयतांविरुद्ध खंडणी व कर्तव्यात कसूर केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी माजी आमदार संतोष चौधरींनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर गुरुवार, 31 मे रोजी सकाळी 10 वाजून दहा मिनिटांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या प्रतिनिधींनी तक्रारीच्या अनुषंगाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर चौधरींसह समर्थकांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, प्रांतांनी सहाय्यक अधीक्षक नीलोत्पल यांना कारवाई करून अहवाल सादर करण्यासंदर्भात पत्र दिल्याचे चौधरी यांनी सांगितले.