कारवाईसाठी प्रोग्रेसिव्ह असोसिएशनतर्फे मोर्चा

0

जळगाव । समृध्द जीवनच्या पदाधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, हक्काचे पैसे परत मिळावे या मागणीसाठी ठेविदारांच्या प्रोग्रेसिव्ह असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला. समृद्ध जीवन मल्टी को-ऑप, सासायटीत ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहे. हे पैसे परत मिळावे यासाठी शहरातील न्यू बी.जे.मार्केटपासून या मोर्चाला सुरुवात झाली. मुक मोर्चात सहभागी ठेवीदारांच्या हातात समृध्द जीवनच्या संचालक मंडळातील सदस्यांचे छायाचित्र असलेले फलक होते यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. समृध्द जीवनला सेबीने गुंतवणुकी संदर्भात निर्बंध घातले आहेत. तरीही या संस्थेचे कामकाज सुरु आहे. संचालक मंडळाच्या विरोधात देशभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. वर्षभरापूर्वी गुन्हे दाखल होऊन अद्यापही केवळ चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत असते.