जळगाव : नंदिनीबाई वामनराव बेंंडाळे कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या वतीने सामाजिक बांधीलकी जोपासत जिल्हा कारागृहात कैद असलेल्या कैद्यांसाठी नेहसंमलेन व सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमात कारागृहात कैद बांधवांनी मनसोक्त आनंद लुटला. याप्रसंगी कैदींनी त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले. तसेच महाविद्यालय राबवित असलेल्या विविध उपक्रमाची दखल घेत महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले स्वयंसेवी संस्थेच्या वतीने कारागृह अधिक्षक डी.टी.डाबेराव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र आणि भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुभाष चौधरी होते. प्रास्ताविक प्रा.डॉ.डि.यु.राठोड यांनी केले.