धुळे : धुळे जिल्हा कारागृहातील फरार शिक्षा बंदी सी/837 शाम परदेशी, रा. शिवाजीनगर, म्युनिसिपल क्वॉटर्स 51, 52 शाळेच्या पाठिमागे, धुळे याच्याविषयी माहिती कळविण्याचे आवाहन धुळे जिल्हा कारागृह अधीक्षक, वर्ग- 1 यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. सदर आरोपी दिलेल्या वेळात हजर न राहिल्याने सदर पत्रक काढले आहे.
कारागृह अधीक्षकांनी म्हटले आहे, फरार शिक्षा बंदी यास 19 डिसेंबर 1997 रोजी 30 दिवस अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. त्याने 4 जानेवारी 1998 रोजी स्वत: कारागृहात हजर होणे आवश्यक होते. सदर बंदी आजपर्यंत हजर झालेला नाही. या बंदीविरुध्द आझादनगर पोलिस ठाणे, धुळे येथे 180/1994, कलम 302, 34 भादविनुसार गुन्हा दाखल झालेला होता. त्याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती. सदर बंद्याविरुध्द भादवि कलम 224 अन्वये 24 ऑक्टोबर 2013 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे, असेही अधीक्षक, धुळे जिल्हा कारागृह वर्ग- 1 यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.