कारेघाटच्या जंगलात बोलेरोतून साडे आठ लाखाचा मद्यसाठा जप्त

नंदुरबार : गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार गुजरात राज्यात अवैधरीत्या होणार्‍या दारू वाहतुकीसाठी नाकाबंदी लावण्यात आली. या दरम्यान नवापूर-लक्कडकोटदरम्यान असलेल्या कारेघाट गावाच्या जंगलाजवळील खोकरवाडा गावाजवळ बोलेरो गाडीतून सुमारे साडे आठ लाख रुपये किंमतीचा अवैध मद्यसाठा जप्त रकण्यात आला असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पहाटेच्या सुमारास कारवाई
महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर तसेच गुजरात राज्यात जाणार्या इतर उपरस्त्यावर गस्त घालून कारवाई करण्याचे आदेश नवापूरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार रविवार, 20 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5:45 वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, गुमानसिंग पाडवी, दिनेश वसुले, दिनेश बाविस्कर, पंकज सुर्यवंशी, विकी वाघ, प्रशांत खैरनार, रणजीत महाले यांच्या पथकाने महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक एम.एच. 39 डी.1183) मधून साडेआठ लाखांचा मद्यसाठा जप्त केला.

एकूण 12 लाखांचा मद्यसाठा जप्त
7 लाख 39 हजार 200 रुपये किंमतीचे एकुण 220 नग खाकी रंगाचे खोके त्यात देशी दारु सुगंधी संत्रा दारु तसेच 93 हजार 600 रुपये किंमतीचे एकूण 30 नग खाकी रंगाचे पुठ्ठ्याचे खोके आढळले. त्यात हेवर्ड्स 5000 स्ट्राँग प्रिमीयम बियरचे भरलेले सिलबंद पत्री टिन, 4 लाख रुपये किंमतीची एक महिंद्रा बोलेरो पिकअप कंपनीची पॅक बॉडी असलेली पांढर्या रंगाची गाडी (क्रमांक एम.एच.39 ओ.डी.1183) असा 12 लाख 32 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.