आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्रींच्या 722 व्या संजीवन समाधी सोहळा कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिरात भल्या पहाटे घंटानाद झाल्यानंतर पूजेत हिवाळ्यातील पहाटेचे थंड वातावरण…. सनई चौघड्यांचे मंजूळ स्वर… आकर्षक फुलांची सजावट… अभिषेकाचा वेदमंत्रघोष… असे ज्ञानभक्ती, मंगलमय वातावरण होते. माऊलींना लाखो भाविकांच्या उपस्थितीत पवमान अभिषेक करण्यात आला. माऊली चरणी वारी समर्पित करण्यास आलेल्या भाविकांच्या हरिनाम गजराने अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. बुधवारी (दि.15) द्वादशीदिनी श्रींचा रथोत्सव होणार आहे.
आ. भेगडे, आ. लांडगेंसह नगराध्यक्षांची उपस्थिती
आळंदी मंदिरात श्रींचे पहाट पूजेस माऊली पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, आमदार बाळा भेगडे, महेश लांडगे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष सागर भोसले, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त अजित कुलकर्णी, योगेश देसाई, विकास ढगे पाटील, व्यवस्थापक माउली वीर, श्रीधर सरनाईक, पोलिस उपविभागीय अधिकारी राम पठारे, खेडचे तहसीलदार सुनील जोशी, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, रामभाऊ रंधवे, राजाभाऊ रंधवे, पुणे जिल्हा प्रशासन अधिकारी डी. जी. लांघी, मुख्याधिकारी समीर भूमकर आदींसह वारकरी संप्रदायातील मान्यवर, आळंदी ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.