मुंबई : सारा अली खानने ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या दोन चित्रपटातूनच भरपूर फॅन मिळवले आहेत. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ या चित्रपटातून साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिच्यासोबत सुशांत मुख्य भूमिकेत होता.
या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री जमली आहे. नुकताच सुशांतने त्याचा ३३वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवसासाठी साराने तिची देहरादून ट्रीप लवकर आटपली. वाढदिवसाच्या रात्री सारा केक घेऊन सुशांतच्या घरी गेली आणि त्यानंतर दोघेही डिनरसाठी बाहेर गेले. डिनरनंतर सुशांतने साराला तिच्या घरी सोडलं. दोघांचं एकमेकांसोबत वेळ घालवणं पाहून सारा-सुशांत बी-टाऊनचे नवीन लव्ह-बर्ड्स आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे.