मुंबई | कार्निवल सिनेमाज या डॉ. श्रीकांत भसी यांच्या अग्रगण्य मल्टिप्लेक्स साखळीने आज त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मोहन उमरोटकर यांच्या नियुक्तीची घोषणा केली. आतापर्यंतचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. सुनील यांना कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बढती मिळाल्याने हे पद रिक्त झाले होते.
भारतात आणि परदेशातील प्रभावी बाजारपेठांमध्ये होणा-या कोट्यवधी डॉलर्सच्या उलाढालींशी जुळवून घेण्यात मोहन निपुण आहेत. त्यांनी कार्यपालन तसेच वित्तीय व धोरणात्मक नियोजनाच्या क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावलेली आहे. मोहन हे एक चार्टर्ड अकाउण्टण्ट असून, मुंबई विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतलेली आहे. यापूर्वी मोहन यांनी रिलायन्स मीडिया वर्क्स ग्रुप या रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समूहाच्या कंपनीत मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून काम केले आहे. या कंपनीत ते प्रदर्शनांच्या आयोजनात सहभागी होते (हा उद्योग नंतर कार्निवल सिनेमाजने संपादित केला). त्यांनी खर्चामध्ये तार्किकता आणण्यासाठी वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे कंपनीत मोठ्या कार्यात्मक आणि वित्तीय सुधारणा घडून आल्या. त्यांनी डेलॉइट येथे काही काळ अॅश्युरन्स प्रॅक्टिस (एखाद्या व्यवहारातील जोखमीबद्दल संबंधित व्यक्ती किंवा कंपनीला चार्टर्ड अकाउण्टण्टने दिलेला सल्ला) केली आहे. यात त्यांनी भारतातील मोठ्या उद्योजक घराण्यांसाठी काम केले आहे. कार्निवल सिनेमाजने ठेवलेले १,००० स्क्रीन्सचे उद्दिष्ट गाठणे आणि कंपनीचे सर्व विभाग आपली उद्दिष्टे पूर्ण करत आहे की नाही हे बघणे ही जबाबदारी कंपनीने त्यांच्यावर टाकली आहे.
कार्यात्मक वित्तीय व्यवहार, करारासाठी बोलणी, विलीनीकरण आणि संपादने, कोशागार, निधी उभारणी उपक्रम, वित्तीय व्यवस्थापन, कररचना, जोखीम व्यवस्थापन आणि परस्परविरोधी धोरणे तयार करणे यांत मोहन यांच्याकडे १८ वर्षांचा गाढा अनुभव आहे. त्यांच्या वित्तीय व व्यावसायिक कौशल्यांमुळे कंपनीला व्यवसायाच्या विविध प्रारूपांची अमलबजावणी करून नफा तसेच गुंतवणुकीतून मिळणारा मोबदला जास्तीत-जास्त वाढवण्यावर लक्ष केंद्रित करता येईल.
या नियुक्तीबद्दल कार्निवल समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. श्रीकांत भसी म्हणाले, “आम्ही मोहन यांचे कार्निवल परिवारात स्वागत करतो. ते विचारांच्या जोरावर काम करणारे परिपूर्ण नेते आहेत. आपली उद्योजकतेची कौशल्ये वापरून गुंतागुंतीची व्यावसायिक आव्हाने पार करण्यासाठी तसेच उद्योगाची उद्दिष्टे सहज साध्य करून प्रभाव पाडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. अत्यंत उत्साहाने व्यवसाय करण्याबद्दलही त्यांची ख्याती आहे. ते आमच्या कंपनीत रुजू झाले याचा आम्हाला आनंद आहे. उद्योगाच्या स्थिर वाढीसाठी आमचे काम सुरू असल्याने मोहन यांच्या योगदानाकडे आम्ही अपेक्षेने बघत आहोत.”
“आपल्या क्षेत्रातील अनुभव व कौशल्य यांच्या जोरावर मोहन यांच्याकडे उद्योगजगतात एक विचारांनी चालणारा नेता म्हणून बघितले जाते. ते केवळ मुरलेले आणि अष्टपैलू आहेत असे नाही, तर कल्पकता आणि ग्राहकांच्या संतोष हे दोन पैलू कंपनीच्या वाढीसाठी आवश्यक आहेत हे समजून घेऊन ते साधण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करायला कायम तयार असतात. आमच्या वाढीच्या इतिहासात एक नवीन प्रकरण लिहिण्याचे वचन त्यांनी दिले आहे,” असे कार्निवल सिनेमाजचे व्यवस्थापकीय संचालक पी. व्ही.सुनील म्हणाले.