शिंदखेडा। राष्ट्रवादी पक्षातून कोणी कुठेही गेले तरी कार्यकर्त्यांनी खचून न जाता एक दिलाने काम करा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असे सूतोवाच जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी केले. शिंदखेडा येथे कार्यकर्त्यांच्या बैठकित ते बोलत होते. सदर बैठकीस राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष ग्रामीण चे रणजीतराजे भोसले, शहरअध्यक्ष प्रकाश चौधरी, जिल्हाउपाध्यक्ष देविदास कोळी, सुयोग भदाणे, किरण जाधव, विजय महाले,रवींद्र माळी , गुलाब भिल, इरफान शेख सह आदी उपस्थित होते.
सामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे म्हणाले की, पक्षातून कोणीही कुठेही केले तरी पक्ष काही संपत नाही, कार्यकर्त्यांनी खचून न जाता एक दिलाने काम करा, स्थानिक कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळत नाही यांची कल्पना आहे. यापुढे निश्चितपणे न्याय दिला जाईल. येणार्या नगरपंचायत निवडणुक स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद करूनच निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल, आघाडी सरकारचा काळात शिंदखेडा शहराचा विकासासाठी साडे पाच कोटी रूपये मंजूर करून आणले होते त्यातुनच रस्ता कॉक्रीटीकरण, एलईडी लाईट चे कामे करण्यात आले, माझा राजकीय जीवनाची सुरूवात शिंदखेडा तालुक्यातून झाली आहे ;म्हणून तालुक्याचा विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहू. तसेच मी शिक्षकाचा मुलगा आहे, टीडीफ कडून उमेदवारी करावी असे मागण्या शिक्षकांकडून येत आहेत म्हणून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे असेही ते म्हणाले.