कार्यकर्त्यांनी मनाशी चंग बांधल्यास आपलीच सत्ता येणार

0

फैजपूर : जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी लढविण्यात येणार्‍या जागांसाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेवून त्या निवडून आणाव्यात आता केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे आपले उमेदवार निवडून आल्यास गटाचा विकास होऊ शकतो. कार्यकर्त्यांनी मनाशी चंग बांधला तर आपले सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येऊ शकतात. यात शंका नाही असे झाल्यास जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये आपली सत्ता येऊन विकासाला चालना मिळूूू शकते असे प्रतिपादन आमदार हरिभाऊ जावळे यांनी केले.

पदाधिकार्‍यांची होती उपस्थिती
आमोदा येथे भारतीय जनता पक्षाचा न्हावी- बामणोद जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार हरिभाऊ जावळे जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मिलींद वायकोळे, माजी कृउबा सभापती हिरा चौधरी उपस्थित होते.

मेळाव्यासाठी यांनी घेतले परिश्रम
तालुकाध्यक्ष डॉ. नरेंद्र कोल्हे, विलास चौधरी, तालुुका सरचिटणीस उज्जैनसिंह राजपुत, पंचायत समिती सदस्या प्रज्ञा सपकाळे, मिना तडवी, कृउबा संचालक उमेश पाटील, जिल्हा परिषद गटप्रमुख संगीव चौधरी, जितेंद्र सपकाळे, हंबर्डी सरपंच किशोर पाटील यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

नऊ उमेदवार इच्छूक
यावेळी आमोदे सरपंच राहुल तायडे, उपसरपंच गणेश कपले यांसह गावातील 40 ते 50 युवकांना पक्षात प्रवेश देण्यात आला. याप्रसंगी इच्छूक उमेदवारांनी आपला परिचय भरुन दिला. त्यात जिल्हा परिषद गटासाठी सहा उमेदवार तर पंचायत समिती गणासाठी तीन उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची इच्छा प्रकट केली. जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, उपाध्यक्ष मिलींद वायकोळे, कृउबा माजी सभापती हिरालाल चौधरी यांनी मार्गदर्शन केले.