धुळे । काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गरजू व सर्वसामान्यांसाठी नेहमीच सहकार्याच्या भावनेने काम करावे. आ.अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 32 वर्षांपासून शहरात तसेच ग्रामीण भागात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम अहोरात्र सुरु आहे. शिरपूरपॅटर्नमधून तालुक्यात सर्वत्र पाण्याची मुबलकता करण्याचे काम सुरु आहे.यामुळे भाजीपाला, विविध नगदी पिके घेवून शेतकरी बांधवंना आर्थिक फायदा होत आहे. काँग्रेसने सुरु केलेल्या विविध योजना सर्वांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी यावेळी केले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जि.प. महिला व बालकल्याण सभापती वंदना गुजर, प्रभाकरराव चव्हाण, सुभाष कुलकर्णी, माधवराव पाटील, नरेंद्रसिंग सिसोदिया, ज्ञानेश्वर पाटील, इशेंद्र कोळी, संजय पाटील, जि.प. सदस्या कल्पना राजपूत, के.डी.पाटील, डॉ.डी.बी.पाटील, कोकीळाबाई गुजर, मांजरोद सरपंच सुनिता पाटील, गोपाल पाटील, राजेंद्र पाटील, जयवंत पाडवी, भुलेश्वर पाटील,प्रकाश भोमा गुजर, शांताराम फुले आदी उपस्थित होते. वासुदेव देवरे, शामकांत ईशी, दिपक गुजर, विनायक कोळी,उज्वलाबाई पाटील, उषाबाई पाटील,महेंद्र राजपूत, नगरसेवक चंद्रकांत कोळी, अरमान पटेल, बभळाजचे अविनाश पाटील, सुनिल जैन, रुपेश पाटले, आकाश मराठे, राजुलाल मारवाडी, गोपिचंद पाटील, गोपाल पाटील,आदी उपस्थित होते.
शासनाच्या योजना पोहचविणार
अंध, अपंग, वृद्ध निराधार, विधवा, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद, घटस्फोटीत, ज्येष्ठ नागरीक तसेच अनेक गरजूंसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी योग्य ते प्रस्ताव तयार करुन घेण्याचे काम व विविध योजनांची माहिती व्हावी म्हणून शिरपूर तालुक्यातील मांजरोद गावात विकास योजना आपल्यादारी योजनेचा शुभारंभ व युवक काँग्रेसमध्ये 150 युवकांचा प्रवेश सोहळा आमदार काशिराम पावरा यांच्या अध्यक्षतेखालीत सेच प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी करण्यात आला.