रावेर। राजकारणाबरोबरच राष्ट्रवादी काग्रेस पार्टी सामाजिक आणि विधायक कार्यात नेहमी अग्रेसर राहुन कार्य करित आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन करीत कांताई नेत्रालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिर एक स्तुत्य उपक्रम आहे, असे मनोगत माजी आमदार अरुण पाटील यांनी रावेर येथे शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले. पुणे अंधजन मंडळ व भवरलाल आणि कांताबाई जैन फौउंडेशन (कांताई नेत्रालय जळगाव), राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सोपान पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. यात सुमारे 112 रुग्णांची तपासणी करण्यात येवुन 11 जणांना शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथे नेण्यात आले.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन आमदार अरुण पाटील बोलत होते. यावेळी धरती पाईपचे संचालक दिलीप अग्रवाल, पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, योगेश पाटील, एल.डी. निकम आदींनी मनोगत व्यक्त केले. हे शिबीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते. यावेळी निळकंठ चौधरी, हद्येश पाटील, हेमेंद्र नगरिया, विलास ताठे, सोपान पाटील कांडवेल, सिताराम महाजन, भास्कर चौधरी, हाजी सैय्यद नुर आदि प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना जळगाव येथे पाठविले
या शिबिरात डॉ. भारत साळवे यांनी सुमारे 112 रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली तर 11 रूग्ण मोतीबिंदूचे आढळून आले. त्यांना शस्त्रक्रियेसाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात येणार आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य युवराज देसर्डा, प्रमोद जैन व रावेर येथील खान्देश माळी महासंघ तालुकाध्यक्ष पिंटू महाजन, सर्व सहकारी यांनी सहकार्य केले.
यावल येथेे ध्वजारोहण
यावल तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वर्धपन दिवस जेष्ठ प्रदेश सदस्य सुकाम पाटील, जिल्हा युवती अध्यक्षा कल्पीता पाटील, दिनु पाटील, तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, शशांक देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचा ध्वज फडकिविण्यात आला. कार्यक्रमास विजय पाटील, युवक अध्यक्ष देवकांत पाटील, शहराध्यक्ष करीम मन्यार, कामराज घारु, गुणवंत निळ, बापू जासुद, डाँ रावेत पाटील, विनोद पाटील, मंगला नेवे, द्वारका पाटील, सुरेखा पारधे, माजी नगरसेवक अकबर खाटीक, मो. युद्दीन खाटीक, प्रकाश चौधरी, देवेद्र पाटील, शरद पाटील, प्रशांत पाटील, भगवान बरडे, मनोहर महाजन, अॅड. कोमलसिंग पाटील, अॅड. निवृती पाटील, निवृती धांडे, योगेश चौधरी, अनिल कोळी, हितेश गजरे व तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.