रावेर- तापी पाटबंधारे विकास महामंडळ उपसा सिंचन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांना नुकताच सिटीझन इंटीग्रेशन पीस इन्स्टिट्यूट नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा डॉ.एपीजे अब्दुल कलाम एक्सलन्स अॅवार्ड पुरस्काराने गौरवण्यात आले. वरणगाव-तळवेल परीसर उपसा सिंचन योजना, कुर्हा-वढोदा-इस्लामपुर उपसा सिंचन योजना व बोदवड परीरसर उपसा सिंचन योजनेची यशस्वी जबाबदारी तुषार चिनावलकर सांभाळत आहेत. वरणगाव-तळवेल परीसर उपसा सिंचन योजनवरील ओझरखेडा साठवण तलावात यंदाच्या हंगामात 30 टक्के जलसाठा करण्यात आला आहे, उर्वरीत योजनेवरील कामे पूर्ण करण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. यासह जलसंपदा विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली ऑल इंडिया काँग्रेस कमेटीचे सेकेटरी तथा निवृत्त मेजर जनरल वेदप्रकाश छत्तीसगड व त्रिपुराचे माजी राज्यपाल के.एम.सेठ तसेच फ्रान्सचे माजी राजदूत के.व्ही.राजन यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. रावेर पंचायत समितीचे माजी सदस्य तथा बाजार समितीचे विद्यमान संचालक गोपाळ नेमाडे यांचे चिनावलकर मेहुणे आहेत.