कार्य असे करा ज्यामुळे देशाला तुमचा अभिमान वाटेल

0

अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल : भुसावळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भुसावळ- माणूस कितीही कठीण परीस्थितीत असला तरी त्याच्या मनात असेल तर तो त्या परीस्थितीवर मात करू शकतो. सातत्याने अभ्यास केला तर त्यामुळे तुमचे नॉलेज वाढते यातूनच तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो आणि स्पर्धा परीक्षा यशस्वी करता येते. ज्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तो कधीही कारणे सांगत नाही. आर्थिक परीस्थिती कधीही माणसाला अडथळा ठरू शकत नाही. मेहनत करणार्‍यांसाठी नेहमी मदतीचे हात पुढे येतात व यासाठी मात्र तुम्ही कर्तृत्ववान असले पाहिजे. विद्यार्थी जीवनात फक्त प्रामाणिकपणे अभ्यासच केल्यानंतर यश मिळले. सार्वजनिक जीवनात असे काम करा की त्यामुळे समाजात तुमचा सन्मान व्हायला पाहिजे. ज्यामुळे तुमच्या नावाने तुमच्या कुटुंबाला, परीसराला व देशाला तुमचा अभिमान वाटेल, असे मार्मिक उद्गार अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी येथे काढले. शहरातील नॉलेज सेंटर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, भुसावळतर्फे नीलोत्पल यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सकारात्मक विचारसरणी आवश्यक
अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल पुढे म्हणाले की, युवकांनी आपल्या भविष्याच्या वाटचालीकडे मार्गक्रमण करतांना आपले लक्ष निश्चित करून कार्य केल्यास कितीही समस्या आल्या तरी त्यावर मात करता येते. त्यासाठी सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. कित्येक वेळा नकारात्मक विचार करणारे लोक तुमच्या मार्गात अडथळा आणतील परंतु त्यावर मात करण्याचे कौशल्य तुमच्यात असले पाहिजे. वेळेचे महत्व ओळखा ती कोणाची वाट पाहत नाही त्यामुळे सोशल मिडीयावर जास्त वेळ न घालविता अभ्यासाला महत्व देण्याविषयीचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांचा अभिमान
प्रा.जतीनकुमार मेढे म्हणो की, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी ज्या वेळी भुसावळातील सूत्र हाती घेतली तेव्हापासून तर आजतागायत परीसरातील गुन्हेगारी बरीच संपुष्टात आणली त्यामुळे शहराला कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाला. त्यांनी केलेले कार्य भुसावळकरांना नेहमीच स्मरणात राहील. असे अधिकारी आपल्या महाराष्ट्रात असणे ही महाराष्ट्राची शान आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नॉलेज सेंटरच्या संचालिका वंशिका के.दिगंबर आणि डॉ.दिगंबर खोब्रागडे यांनी नीलोत्पल यांचा सत्कार केला.

यांनी घेतले परीश्रम
प्रास्ताविक डॉ.दिगांबर खोब्रागडे यांनी तर सूत्रसंचालन कंडारी जिल्हा परीषद शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन जाधव यांनी केले. आभार नॉलेज सेंटरच्या संचालिका वंशिका के.दिगंबर यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा.जतीनकुमार मेढे, प्रा.मुकेश पवार, इरफान शेख, शुभाष पाटी ल, युपीएससी, एमपीएससी, आरआरबी, स्टाफ सिलेक्शन आणि इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विध्यार्थी आणि शांती नगर मधील बरेच नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रिंकू भोळे, शेखर पाटील, रितेश राणे, मोनू पाटील, अरमान खान, शुभम वारके, सनी शिंगटे, पंकज लढे, नितीन भालेराव, योगेश भालेराव, रीझवान कासारे, ममता पाटील यांनी परीश्रम घेतले.