कार्ला ‘पीएचसी’ला आरोग्य सेवा संचालकांची भेट

0

कार्ला : राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेनिमित्त महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार यांनी कार्ला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या भेटीप्रसंगी त्यांनी मोहिमेची माहिती जाणून घेत मार्गदर्शक सूचना केल्या. या दौर्‍यात डॉ. पवार यांनी मावळातील प्राथमिक शाळा व अंगणवाड्यांनादेखील भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शेळके, जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तनुजा कुलकर्णी, मावळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहार उपस्थित होते.

बालकांना जंतनाशक गोळ्यांचा डोस
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला अंतर्गत देवघर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व दोन अंगणवाड्यांमधील मुलांना जंतनाशक गोळीचे डोस देण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या कुसुम काशिकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना पुणे जिल्हा परिषदेचे आयुष अधिकारी बी. पी. गावडे म्हणाले की, जंतनाशक गोळीमुळे मुलांमधील कुपोषण, रक्ताक्षय, भूक न लागणे, अशक्तपणा, शौचावाटे रक्त पडणे आदी आजारांना प्रतिबंध होतो. याकरिता सर्व बालकांनी हा डोस घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यांची होती उपस्थिती
या मोहिमेप्रसंगी कार्ला आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. चव्हाण, जिल्हास्तर पर्यवेक्षक दत्तात्रय शिनकर, आरोग्यसेवक पी. एम. काटे, एस. ए. चव्हाण, अंगणवाडी सेविका देशमुख, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुहास विटे, टिंगळे, जगताप, उषा आहेर यांची उपस्थिती होती.आले. या कार्यक्रमप्रसंगी ‘मध व मधाचे महत्त्व’, ‘मधमाशी पालन’ या विषयांवर विजय महाजन यांनी मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला मार्गदर्शक विजय महाजन, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे, डॉ. ढाके फाळकर, सुनील कडोलकर, मुख्याध्यापिका हेलन अंथोनी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ, नगरसेवक अरूण माने, किशोर कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.