कार अपघातात ७ मुलांचा मृत्यू

0

अहमदाबाद – पंचमहल ज‍िल्ह्यात एक कार नाल्यात पडून झालेल्या अपघातात ७ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाडीमध्ये १० जण प्रवास करीत होते. सर्व मुले एकाच कुंटुबातील होते. जाबुंघोडा शहरातील भट गावाजवळ रविवारी हा अपघात घडला.

भट गावाजवळील हलोल बडोली मार्गावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्ताच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन पडली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी बचाव कार्याला सुरुवात करून ३ जणांना बाहेर काढले.

हे सर्व प्रवासी बोडेली येथील रहिवासी असून, नातेवाईकांना भेटून परत येत असताना हा अपघात घडला. दरम्यान ,या अपघातात बचावलेल्या ३ जणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहीती पी.आय. ए. बी.देवढा यांनी दिली आहे