जळगाव । येथून कार चोरी अमरावतीत घरफोड्या करणार्या तीन चोरट्यांना जिल्हापेठ पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी के. एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असतात त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जळगाव शहरातील द्रौपदीनगर भागातून 24 ऑक्टोबर 2016 रोजी रात्री जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका विभाग) अनिकेत मानोरकर यांची कार (एम.एच. 19, बी यू 9795) तर 21 डिसेंबर रोजी निवृत्ती नगरातील राजकुमार राजेंद्र जैन (वय 33, रा. निवृत्तीनगर) यांची कार (क्र. एम.एच. 34 एफ 2332) चोरीला गेली होती. या प्रकरणी अमरावती ग्रामीण एलसीबीच्या ताब्यात असलेल्या शशिकांत मारोती बागळे (वय 25, रा. अकोला), पवन रामदास आर्या (वय 30, रा. इंदूर),राजा उर्फ राजेश बाजीराव राऊत (वय 25, रा. अकोला) यांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यांना न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असतात त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
एका संशयिताच्या वकीलातर्फे युक्तीवाद पुर्ण
जळगाव । सिमी खटल्यातील दोन्ही संशयितांचे 1 डिसेंबर रोजी जबाब पूर्ण झाल्याने 4 जानेवारी रोजी सरकार पक्षातर्फे युक्तिवादाला सुरुवात झाली होती. या प्रकरणी 25 जानेवारी रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांच्या न्यायालयात सरकारपक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. तर मंगळवारी बचावपक्षातर्फे युक्तिवादाला सुरूवात झाली असून मंगळवारी आसीफ खान या संशयिताच्या वकीलांतर्फे युक्तीवाद पुर्ण झाला तर दुसर्या संशयिताच्या वकीलांच्या युक्तीवादास बुधवार पासून सुरूवात होणार आहे. सिमी खटल्यातील संशयित असिफ खान बशीर खान (वय 44), परवेज खान यांचे 1 डिसेंबर रोजी जबाब पूर्ण झाले आहेत. त्यानंतर सरकारतर्फे अंतिम युक्तिवादा झाला. मंगळवारी संशयीत असिफ खान याचे वकील ए. ए. खान यांनी युक्तिवाद पूर्ण केला. बुधवारी या प्रकरणातील दुसरा संशयीत परवेज खान याच्यातर्फे अॅड. सुनील चौधरी युक्तिवाद करणार आहेत.