कार चोरट्यास पोलिस कोठडी

0

जळगाव । विक्रम दास यांची एमएच-02-सीआर-1877 ही कार घेवून सैय्यद समीर सैय्यद युसुफ (वय 24 रा. बुलडाणा) हा घेवून पसार झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना सैय्यद समीर याला अटक करण्यात यश आले आहे. दरम्यान, त्याला आज रविवारी न्या. साठे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्या. साठे यांनी त्याला 19 जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अविनाश पाटील यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड. एस.सी.पावसे यांनी कामकाज पाहिले.