जळगाव । वाशी येथून भाड्याने आणलेल्या कार चालकाला रात्री विटनेर गावाजवळ उतारून कार घेऊन पोबारा केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. नवी मुंबई परिसरातील वाशी येथून जामनेर येथे लग्नास जात असल्याचे सांगून दोघांनी कार (जीजे 09 बीडी-1817) भाड्याने घेतली होती. त्यानंतर 29 डिसेंबर 2016 रोजी विटनेर गावाजवळ आल्यानंतर रात्री 12 वाजेच्या सुमारास चालकाला खाली उतरवून कार घेऊन औरंगाबादच्या दिशेने पोबारा केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी 19 मे रोजी सय्यद शकील सय्यद युसूफ याला अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्याला न्यायाधीश चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 24 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अॅड. कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.