जळगाव। कार चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरूवारी संपली. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांच्या न्यायालयात हजार केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.
महागड्या कार चोरणार्या सय्यद शकील सय्यद युसूफ (वय 37, रा. बुलडाणा), महंमद एजाज जलालुद्दीन काझी (वय 49, रा. औरंगाबाद) यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरूवारी संपली. त्यांना न्यायाधीश भळगट यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.
दोन चोरट्यांना कोठडी
कार चोरी प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी सय्यद इम्रान सय्यद कुर्बान (वय 47, रा. औरंगाबाद), आबेदखान उर्फ गुड्डु नासिर खान (वय 34, रा. औरंगाबाद) यांना बुधवारी ताब्यात मिळण्यासाठी न्यायाधीश भळगट यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्यांना गुरूवारी अटक करून न्यायाधीश भळगट यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 3 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.