कार चोरीतील तिसर्‍या संशयितास कोठडी

0

जळगाव । देवेंद्रनगरातील साईदास मोरसिंग राठोड यांची कार (क्र. एमएच-19, बीयू, 8481) 12 जुलै 2016 रोजी रात्री चोरीला गेली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या गुन्ह्यात बुलडाणा जिल्ह्यातील तिसर्‍या संशयीत हर्षद भगवान गंगतीरे याला 24 रोजी अटक केली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी के. एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 1 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या चोरट्यांनी 12 फेब्रुवारी रोजी पुणे शहरातून कार (क्र. एमएच-14-एव्ही-3911) कार चोरून हैदराबाद येथे विकल्याची कबुली पोलिसांनी केलेल्या चौकशीत हर्षल याने दिली आहे. कार विकत घेणार्‍यांच्या तपासाठी पथक रवाना झाले आहे.