जळगाव- महामार्गावर नशिराबाद-जवळ सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास कार व टँकरच्या अपघातात महामार्गावर सुमारे तीन किलोमीटरपर्यंतच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनधारकांची गैरसोय झाली. उशीरापर्यंत पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु होेते. नेमके महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने दोन्ही बाजूने रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे चारचाकी व दुचाकी अशा दोन्ही प्रकाराच्या वाहनांची रस्त्यावर एकच गर्दी होवून वाहने काढण्यास कुठल्याच प्रकारची जागा नसल्यानेक वाहतुकीची कोंडी झाली. उशीरापर्यंत अनेक वाहनधारकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.