धुळे । अकोला येथे राधास्वामी सत्संग कार्यक्रमासाठी निघालेल्या धुळ्यातील तुलसानी या सिंधी समाजातील परिवारावर काळाने घाला घातला. अकोला जिल्ह्यातील मलकापूर शहराजवळ ताळसवाडा फाट्यावर त्यांच्या व्हॅगनर कारला ट्रकने जोरदार धडक दिल्याने तुलसानी परिवारातील 3 जण जागीच ठार झाले तर 3 जण गंभीर जखमी असल्याची घटना रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने कुमार नगरात शोककळा पसरली आहे. सोमवारी दुपारी 4 वाजता मृतांवर अत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती सिंधी पंचायत चे अध्यक्ष गुलशन उदासी यांनी दिली आहे. धुळे येथून कुमार नगरातराहणारे तुलसानी परिवारातील 6 जण मारोती व्हॅगनर कार क्र.एम.एच 04-ए.आर 4705 या गाडीने अकोला येथे राधास्वामी सत्संग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी
निघाले होते.
ट्रकचालक फरार
रविवारी रात्री ते राष्ट्रीय महामार्ग 6 वरून मलकापूर शहराच्या पुढे ताळसवाडा फाट्याजवळ पोहोचले असतांना समोरून आलेल्या ट्रक क्र. जी.जे03/ए.पी07 हिने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यात रूमा महेशलाल तुलसानी (वय 40), नवीन परशराम तुलसानी(वय22), करीश्मा दुसेजा(वय20) हे जागीच ठार झाले. तर सोबत असलेले भूमी तुलसानी (वय13), जुही तुलसानी(वय 14), निशातुलसानी (वय 50) हे तीन जणगंभीर जखमी झाले आहे. जखमीं पैकी दोन्ही मुलींना मलकापूर येथे तर महिलेला अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. कारला धडक देणारा ट्रकचालक अपघातानंतर पसार झाला आहे.