कार-डंपर अपघातात एक ठार : दोघे जखमी

भुसावळ : भरधाव डंपरची चारचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना साकेगाव महामार्गावरील आयुष प्रोटॉन कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ सोमवार, 17 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. भुसावळकडून जळगावकडे जाणारी कार (क्रमांक एम.एच.18 डब्ल्यू.5783) जात असताना महामार्ग प्राधिकरणाचे कंत्राट दिलेल्या आयुष्य प्रोकाँ कंपनीच्या कॅम्प आवारातून त्याचवेळी डंपर (क्रमांक एम.एच.19 सी.वाय.2280) हा निघाला असता कार चालकाला अंदाज न आल्याने डंपरवर कार आदळली. या अपघातात सागर सावळे (23, रा. शामनगर, गेंदालाल मिलजवळ) यांचा मृत्यू झाला तर मयूर काळे (21) अंकुश सुरवाडे (22, दोन्ही रा.जळगाव) हे जखमी झाले. अपघात टाळण्यासाठी कार चालकाने प्रयत्न केले मात्र सुमारे 20 फुटापर्यंत कार घसरत जावून ती डंपरवर आदळली. जखमींवर गोदावरी रुग्णालयात उापचार सुरू आहेत. जखमींना साकेगावकरांनी उपचारार्थ हलवण्याकामी सहकार्य केले.