कार डेकोरेटर्सचे दुकान फोडणारा दुसरा आरोपीही जाळ्यात

0

भुसावळ- शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील माळी भवन कॉम्प्लेक्समधील कार डेकोरेटरच्या दुकानातून चोरट्यांनी नऊ हजार 500 रुपयांची रोकड लांबवण्यात आली होती. या प्रकरणी निलेश सुरेश भालेराव (35, रा.पांडुरंग नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होता. या प्रकरणी सुुरुवातीला कुणाल वामन इंगळे (25, रा.पंचशील नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आल्यानंतर त्यास 20 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती तर सोमवारी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली तर आरोपीचा साथीदार समशेर शहा सलीम शहा (20, रा.पंचशील नगर, भुसावळ) हा पसार होता तो सोमवारी शहरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई उपअधीक्षक गजानन राठोड, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील एएसआय अंबादास पाथरवट, सुनील जोशी, विकास सातदिवे आदींनी केली आहे. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.