कार बुडाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

0

मध्य प्रदेश: भिंड जिल्ह्यातील मेहगाव येथील बेसली नदीत एक व्हॅन बुडाल्याने एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ओमप्रकाश पटेरिया त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.

मेहगाव येथील बेसली नदी दुथडी भरून वाहत होती. नदीच्या पाण्याला वेग असतानाही पटेरिया यांनी व्हॅन पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला. पाण्याच्या वेगात व्हॅनचा टिकाव लागला नाही आणि ती वाहून जावू लागली. त्याचवेळी ग्रामस्थांनी व्हॅनमधील तिघांना वाचवले. वाचवण्यात आलेल्या तिघांना मेहगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.