चेन्नई : भारताचा लोकप्रिय कार रेसर अश्विन सुंदर याचा शनिवारी कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. कार एका झाडाला आदळल्याने आग लागून अश्विन आणि त्याच्या पत्नीचा जळून मृत्यू झाला. अश्विन आणि त्याची पत्नी निवेदिता बीएमडब्ल्यू कारने प्रवास करत होते. संथोम महामार्गावर त्यांची कार एका झाडावर आदळली. त्यामुळे कारने पेट घेतला. अश्विनला दरवाजा उघडता न आल्याने त्याचा आणि त्याचा पत्नीचा मृत्यू झाला. पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहचून कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दीड तासाच्या प्रयत्नानंतरही दरवाजा न उघडता आल्याने अखेर कारचा वरचा भाग कापून या दोघांचे मृतदेह बाहेर काढावे लागले. निवेदिता या चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात डॉक्टर आहेत. हे दोघेही पोरुरजवळील अलपक्कम येथे राहतात. ते एमआरसी नगरच्या राजा अण्णामलाईपूरम येथे मित्राच्या घरी गेले होते. तिथून घराकडे परतताना हा अपघात झाला.