कार विकण्याच्या बहाण्याने एकाची 3 लाखात फसवणूक

0

पिंपरी : जुनी कार विकण्याच्या बहाण्याने एकाची तब्बल 3 लाख 16 हजार 300 रुपयांची फसवणुक केली. हा प्रकार 21 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत घडला आहे. विजय भगवान दगडे (वय 36, रा. ताथवडे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महेश कुमार आणि डॉ. निलेश बोराडे (संपूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, जुनी कार विकायची आहे, असे सांगून फिर्यादी विजय यांचा आरोपींनी विश्‍वास संपादन केला. तसेच आरोपींनी विजय यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून गाडीचे एयरपोर्ट येथील पार्कींगसाठी व कार विम्याच्या नावाखाली विजय यांच्याकडून वेळोवेळी 3 लाख 16 हजार 300 रुपये बँक खात्यावर टाकण्यास सांगितले. विजय यांनी पैसे दिले तरी त्यांना कार देण्यात आली नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक आर एम केगार तपास करीत आहेत.