हडपसर । हडपसर वाहतूक शाखेशेजारील नवीन मुळा-मुठा कालव्यात साचलेल्या कचर्याच्या ढिगार्यात 35 वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह पाण्यात सडलेल्या अवस्थेत आढळून आला. चेहरा ओळखता येणे मुश्किल होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढले. गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अंजुमन बागवान यांनी मृतदेह पुरुष असून पाण्यात खूप दिवसांपासून पडल्यामुळे त्याच्या शरीराचे सर्व भाग कुरतडल्याने ओळख पटणे मुश्किल झाले आहे. याबाबत इतर पोलीस ठाण्याद्वारे मिसिंगची चौकशी करत असल्याचे सांगितले.