‘काला’ बघण्यासाठी एका कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सुट्टी

0

मुंबई- दोन वर्षानंतर बॉलीवूडच्या पडद्यावर झळकणारे अभिनेता रजनीकांत हे ‘काला’ चित्रपट घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. काल त्यांचा ‘काला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीपासून चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. काही ठिकाणी चाहत्यांनी रजनीकांतच्या फोटोला दुग्धाभिषेक केला. रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज निर्माण झाली आहे.

 राजकीय विषयावर

दरम्यान एका आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ‘काला’चित्रपट बघण्यासाठी सामुहिक सुट्टी दिली आहे. विशेष बाब म्हणजे ही कंपनी तमिळनाडूतील नाही तर केरल राज्यातील कोच्ची येथील आहे. ‘काला’चित्रपट तमिळ भाषेत तयार करण्यात आलेला आहे. हा चित्रपट राजकीय विषयावर आहे.