जळगाव – राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा चौफुलीवर झालेल्या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाल्याची घटना ३० रोजी घडली होती. याप्रकरणी सोमवारी रोजी रात्री दुचाकीधारकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तरानीसेन राजेंद्र बारीक (वय-३०) रा. आयोध्यानगर हे त्यांची कार (ओडी ०२ बीसी ०८८७) ने ३० जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी व मुलगासह अजिंठा चौफुलीकडून कालिंका मंदिराकडे जात असताना त्यांच्या मागे असलेल्या दुचाकी क्रमांक (एमएच 19 बीटी 2342) दुचाकीधारकांने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालवत असल्यामुळे झालेल्या अपघातात तराने तरानीसेन राजेंद्र बारीक यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलगा आणि दुचाकीवरील मुलगी व स्वत: दुचाकीधारक हे जखमी झाले. या अपघातात कारसह दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी सोमवारी ३१ जानेवारी रोजी रात्री उशीरा कारचालक तरानीसेन बारीक यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे.
————————————-
तरूणाची ऑनलाईन फसवणूक ; गुन्हा दाखल
जळगाव। शहरातील निमखेडी परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरूणाला पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवत ऑनलाईन पध्दतीने १ लाख ४८ हजार ५७३ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, रोहन गजानन पाटील (वय-१९) रा. कल्याणी नगर, निमखेडी परिसर जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता त्याला एका अनोळखी मोबाईल नंबरच्या टेलीग्रॉम ॲपवर सुरेंद्र नावाच्या व्यक्तीने पार्ट टाईम नोकरी लावण्याचे सांगितले. त्यानुसार जॉबची ऑर्डस पास करून देतो असे सांगून ऑनलाईन पध्दतीने पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार रोहनने फोन-पे च्या माध्यमातून एकुण १ लाख ४८ हजार ५७३ रूपये ऑनलाईन पध्दतीने ट्रान्सफर केले. ७ डिसेंबरपर्यंत सुरूच होता. यात पार्ट टाईम नोकरी मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तरूणाने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.
——————————
अमरनाथ हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय ; तिघांना अटक
जळगाव। जळगाव-औरंगाबाद रोडवरील अमरनाथ हॉटेलात वेश्या व्यवसाय चालवित असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीला आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी तीन जणांना अटक केली आहे. यात हॉटेल मालकाचा समावेश आहे.
जळगाव औरंगाबाद महामार्गावर असलेल्या अमरनाथ हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, आशा पांचाळ, सुनिल पाटील, किरण धमके, चंद्रकांत चिकटे, संतोष जाधव, रविंद्र सुरळकर, रविंद्र कारंकाळ, मिलींद पाटील यांनी सोमवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अमरनाथ हॉटेलमध्ये छापा टाकला. या कारवाईत राजेश मिठाराम ठोंबरे (वय-४९) रा. जुना खेडी रोड, जळगाव, विकास रमेश सोनवणे (वय-२७) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांच्यासह दोन महिलांसोबत आढळून आले. याप्रकरणी पोलीस उनिरीक्षक निलेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक शंकर दुलाराम महाजन वय ४१ रा. हनुमान नगर, जळगाव, ग्राहक राजेश मिठाराम ठोंबरे आणि विकास रमेश सोनवणे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे करीत आहे.