काल पिंप्राळ्यात आज एमआयडीसीतील कुंटणखान्यावर छापा

0

सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ . नीलाभ रोहन यांची कार्यवाही ; दोन पुरुषांसह दोन महिला ताब्यात

जळगाव- शहरातील प्रिंप्राळा पसिरसरातील कुंटणखान्यावर छापा टाकल्याची घटना ताजी असतांनाच सोमवारी पुन्हा पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी एमआयडीसी परिसरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांसह दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षकांना मिळाली माहिती
पोलीस अधीक्षक डॉ . पंजाबराव उगले यांना शहरातील एमआयडीसी परिसरात 45 वर्षीय महिला तिच्या राहते घरात कुंटणखाना चालवित असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांना सुचना केल्या. रोहन यांनी माहितीनुसार पोलीस निरीक्षक बापु रोहोम, सहायक पोलीस निरीक्षक निता कायटे, विनयकुमार देसले, रमेश जाधव , विजय पाटील, रामकृष्ण पाटील , नरेंद्र वारुळे, ललीता सोनवणे, मिनल साकळीकर , छाया मराठे , सुनिल दामोदरे, महेश पाटील, अशोक फुसे , महेश महाजन या पथकासह सोमवारी सायंकाळी छापा टाकला. 45 वर्षीय मालकीन महिलेसह 27 वर्षीय पिडीत, तसेच दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 10 हजार 680 रुपये हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्त्रीया अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम सन – 1956 चे कलम 3,4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यांपासून हा कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. एक दिवसाआड पोलिसांच्या या कारवाईनंतर खळबळ उडाली.