काळवीटास धडक दिल्याने एक ठार

0

जळगाव । पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव व जामनेर तालुक्यातील मालखेडा रस्त्यावरील भोकरी येथील मोटारसायकल स्वारने एका काळविटाला धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. शनिवारी ही घडना घडली. वनपरिक्षेत्र पाचोरा अंतर्गत येणार्‍या वनपरीमंडळ नांद्रा नियतक्षेत्र मालखेडा हद्दीत भोकरी येथील भंगार व भांड्याचा व्यवसाय करणारा खलील मंगू कहाकर वय 55 हा मालखेडा या गावात विक्री करुन घरी जात असतांना हा अपघात झाला. घरी जात असतांना वाहना समोर अचानक 30 ते 40 हरणांचा कळप पळत आला.

खलीलने हरणांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र काळवीट (नर) जातीच्या हरणाला धडक बसली. रस्ता हायवे असल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. वनपाल एस.टी.भिलावे व वनरक्षक ए.एस.ठोंबरे यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. जखमी काळविटला उपचारासाठी पाचोरा येथे नेण्यात आले.