जळगाव – देशभरात दि. ३ मेपर्यंत लॉकडाऊन झाल्यानंतर मद्यासह, गुटखा, तंबाखुजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू झाला आहे. लॉकडाऊनमुळे मद्य विक्री बंद असल्याने शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसूल बुडत आहे. तिपटीच्या दराने मद्याचा विक्री होऊन काळाबाजार केला जात आहे. हा काळाबाजार थांबविण्यासाठी व महसूल वाढीसाठी मद्य विक्रीला अटी-शर्तींच्या आधारावर परवानगी द्यावी अशी मागणी रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनचा मोठा परिणाम शासनाच्या तिजोरीवर होत आहे. शासकीय कामे ठप्प झाल्याने महसुली उत्पन्नात घट आली आहे. अशातच जिल्ह्यात मद्यविक्री बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत आहे. नुकत्याच झालेल्या दोन कारवाईवरून हे निष्पन्न झाले आहे. दुप्पट आणि तिप्पट दराने चोरी-चोरी, चुपके-चुपके मद्याची विक्री होत आहे. एकीकडे मद्य विक्रीला परवानगी नसल्याने शासनाचा महसूल बुडत आहे तर दुसरीकडे मात्र याच मद्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत आहे. जिल्ह्यात कुठल्याही वस्तुचा काळाबाजार होऊ नये असे शासनाचे आदेश आहे. असे असतांना जिल्ह्यात मद्य विक्रीचा काळाबाजार सर्रासपणे सुरू आहे. हा काळाबाजार थांबवुन शासनाच्या महसुलात वाढ करण्यासाठी मद्य विक्रीच्या दुकानांना अटी-शर्तींच्या आधारे परवानगी द्यावी अशी मागणी रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.