काळा पैसा पांढरा करणारे दानवेंच्या मुलाचे लग्न!

0

पुणे । भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या शाही विवाहसोहळ्यात बेहिशेबी काळा पैसा पांढरा झाला आहे. आयकर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी पुण्यातील वकील असीम सरोदे यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.

रावसाहेब दानवे यांचे चिंरजीव आमदार संतोष दानवे यांचा 3 मार्च रोजी औरंगाबादेत शाही विवाहसोहळा पार पडला. या विवाह समारंभाला 40 हजार लोक उपस्थित होते. 1 कोटी रुपयांचा मंडप, दीड लाख लग्नपत्रिका, महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या सुरक्षेसाठी 1500 बाउन्सर्स नेमले होते. लग्नाच्या 3 दिवस आधी आणि नंतरही औरंगाबादमधील बहुतांश पंचतारांकित हॉटेल बूक होती. लग्नाकरिता 8 चार्टर विमानाची व्यवस्था होती. त्यामुळे दानवे यांचा कमाईचा स्रोत आणि लग्नातील खर्च यातील तफावतीचा मेळ आयकर विभागाने तपासावा, असेही त्यांनी म्हटले आहे.