काळेवाडीत विदेशी मद्याचा साठा जप्त

0

पिंपरी-चिंचवड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने काळेवाडी येथे रविवारी छापा टाकला. या कारवाईत एक लाख 41 हजार रुपये किमतीचा विदेशी मद्य साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत शशी जमुनादास हिराणी (वय 35, रा. उल्हासनगर), या संशयित आरोपी अटक करण्यात आली.

खबर्‍याकडून मिळाली माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास, काळेवाडी येथे विदेशी मद्याचा बेकायदेशीर साठा असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने काळेवाडीत छापा टाकला. दमण या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी असणारे विदेशी मद्याचे सतरा बॉक्स जप्त करण्यात आले. या मद्य साठ्याची किंमत एक लाख 41 हजार रुपये इतकी आहे. बेकायदेशीर मद्याचा साठा केल्याप्रकरणी दारुबंदी कायद्यानुसार राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने ही कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक मोहन वर्दे, उपाधिक्षक सुनील फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तानाजी शिंदे, उपनिरीक्षक एम. व्ही. कदम, एस. वाय. दरेकर, एस. एस. कांबळे, एम. व्ही. जाधव यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.