काळेवाडी : विश्व जागृती मिशन, पुणे मंडळातर्फे काळेवाडी येथील बालाजी लॉन्समध्ये 19 ते 21 जानेवारी या कालावधीत ‘विराट भक्ती सत्संग’ व ’भजन संध्या’ या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भक्ती सत्संग कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता राष्ट्रसंत आचार्य सुधांशु महाराज यांचे व्याख्यान होणार आहे. सत्संगाचा कार्यक्रम शनिवार (दि. 20) व रविवारी (दि. 21) सकाळी साडेनऊ ते साडेअकरा आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेत होणार आहे.
विश्व जागृती मिशन पुणे मंडळ आणि प्रियदर्शनी सोशल ग्रुप, पिंपरी यांच्या वतीने शनिवारी (दि. 20) मथुरा येथील विनोद अग्रवाल व ग्रुपचा ’एक शाम बांके बिहारी के नाम – भजन संध्या’ हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम सायंकाळी साडेसात वाजता सुरु होणार असून यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. संपूर्ण कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.