पिंपरी : काळेवाडी फाटा येथे उड्डाणपुलाखाली एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. वय अंदाजे 30 ते 35, रंग सावळा, चेहरा गोल, मध्यम बांधा, डाव्या हाताच्या दंडावर त्रीशुळ गोंदलेले, अंगावर पांढर्या रंगाचा ठिपक्यांचा शर्ट, काळी पॅन्ट, काळ्या चपला अशी मयत व्यक्तीचे वर्णन असून दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. तरी संबंधीत व्यक्तीची ओळख पटल्यास वाकड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.