काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे रेशन धान्य पकडले

0

तलासरी । तलासरी तालुक्यातील उधवा मिसाळपाडा येथून रास्तभाव दुकानामधील गहू आणि तांदूळ केंद्रशासित प्रदेशातील दादरा नगर हवेली येथे काळ्या बाजारात विक्री साठी जात असताना ग्रामस्थानी पकडून दिला. तालुक्यातील रास्तभाव दुकानात आदिवासी गोरगरीब जनतेसाठी येणारा तांदूळ व गहू इत्यादी मालाची मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्री केली जाते. उधवा, सायवन, मोडगाव, कोदाड येथून केंद्रशासित प्रदेशात तर तलासरी मधील महामार्गावरील तसेच इतर आसपासच्या दुकानातील रेशनिग माल मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजता काळ्या बाजारात जाणार टेम्पो पकडून दिल्यानंतर ही रात्री उशिरा पर्यन्त गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता मात्र वृत्तपत्र प्रतिनिधी तहसिलदार कार्यालयात पोहचल्यानंतर तहसिलदार विशाल दौडकर यांनी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू केली.

टेम्पो मालकाला अटक
या प्रकरणी टेम्पो मालक युनूस इब्राहिम यमदानी याला अटक करण्यात आली असून एक टेम्पो तसेच रेशन धान्य असा एकूण 1 लाख 92 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. केंद्रातील व राज्यातील शासन भ्रष्ट्राचार मुक्त व पारदर्शक कारभाराचा आव आणत असले तरी भ्रष्टाचार व काळा बाजार रोखण्यात सरकार अपयशीच ठरल्याचे यावरून दिसून येत.

तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षक यांना घटनेची माहिती देऊन ही घटनस्थळवर पंचनामा न करता कार्यलतात येऊन टेम्पो मालकाशी अधिकारी प्रकरण दडपण्यासाठी चर्चा करीत होते. शिवाय पोलीस पंचनामा व गुन्हा न नोंदविता टेंपोमधील धान्य शासकीय गोदामात उतरविण्यात आले.
– देवराम कुरकुटे, ग्रामस्थ.