मनमानी कारभारचा नगराध्यक्षांवर केला आरोप
नवापूरच्या सभेतील प्रकार; नगराध्यक्षाचा केला निषेध..!
नवापूर – नवापूर नगरपालिकेत नगराध्यक्षा यांच्या मनमानी कारभाराचा निषेध नोंदवून राष्ट्रवादी या विरोधी गटाच्या नगरसेवकांनी सभा त्याग केला 16 आँगस्ट रोजी नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी सभा बोलावली होती. जनरल सभेत या सभेत चार नगरसेवकांनी काळे वस्त्र परिधान केले होते. त्यांनी पीठासन अधिकारी अयुब बलेसरिया यांना पत्र देऊन जनरल सभेत न बसता सभात्याग करुन बाहेर घोषणाबाजी केली. नगराध्यक्षा हेमलता पाटील या वैयक्तीक कामामुळे सभेत गैरहजर होत्या त्यांचा जागी आज जनरल सभेचे पिठासीन अधिकारी म्हणुन उपनगराध्यक्ष अयुब बलेसरीया यांनी काम पाहीले. नगर पालिकेचा जनरल सभेत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक खलील खाटीक, नगरसेविका सविता नगराळे, नगरसेविका मिनल लोहार यांनी काळ्या रंगाचा पोषाक परीधान करुन नगराध्यक्षाचा मनमानी कारभाराचा जाहीर निषेध करुन नगरपालिकेत घोषणाबाजी केली. त्यांनी आपण सूचविलेली कामे विषय पत्रिकेवर घेण्याचे टाळण्यात येत असल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे आहे.
शास्ञीनगर,बजरंगचौक, पोलिस स्टेशनपासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत हा रस्ता परप्रांतीय अवजड वाहनांचा वर्दळामुळे पूर्ण खराब होवून मोठे खड्डे पडले आहेत, तसेच गढी परीसरात पूर्ण रस्ता खराब झाला असून पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. पाऊस आला की परीसरात पाणी तुंबते त्यामुळे मज्जीद मध्ये जाणार्या नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. असे विषय आपण विषय पत्रिकेवर घ्यावेत म्हणून आम्ही आपणास वेळोवेळी अनेक पत्रे दिले आहेत; परंतु अद्यापावेतो आपण आमचे विषय पत्रिकेत घेत नाही म्हणून आम्ही खालील सह्या करणारे नगरसेवक सभात्याग करीत असल्याचे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. विषय पत्रिकेत विषय घेण्याचे अधिकारी पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांचे असतात. माझा अधिकारात ते नसल्याचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
कोट –
१.वार्ड 3 व 8 प्रभागा मध्ये 40 कामाचा ठराव करण्याचे विषय आम्ही दिले आहे.पण हेतु पुरस्कर व्देष भावनेने आमचे विषय घेण्यात येत नाही,भेदभाव केला जात आहे म्हणुन आम्ही नगराध्यक्षांचा जाहीर निषेध करतो – नरेंद्र नगराळे, विरोधी पक्षनेता
२. वरोधी गटातील नगरसेवकांचे आरोप हे बिनबुडाचे असुन ते साफ चुकीचे आहेत. प्रभाग क्रमांक 3 व 8 मधील कामाचा जो विषय आहे तो प्रस्तावित असुन त्या कामांची अंमलबजावणी दिड महिन्यात होणार आहे.सर्वच प्रभागातील कामे होतील.जस जसा निधी येईल त्या प्रमाणे कामे होतील. मी लोकनियुक्त नगराध्यक्ष असुन मला शहरातील प्रत्येक कामांची काळजी आहे. – हेमलता पाटील, नगराध्यक्ष